पुणे-.“अलीकडच्या वर्षांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा स्वीकार लक्षणीय आहे. पुणे हे गतिशील आयटी केंद्र म्हणून पुढे आले असून तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आणि डिजिटल परिवर्तन याबाबतीत ते अग्रेसर आहे. ही उगवती स्टार्टअप इकोसिस्टिम ही या शहरात चालना मिळत असलेल्या प्रयोगशीलतेची निदर्शक आहे असे मत सीआरएम क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपन्यांपैकी एक असलेल्या सेल्सफोर्स इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारतातील डिजिटल परिवर्तनासाठी आपली कटिबद्धता आणखी बळकट केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि स्वयंचलन (ऑटोमेशन) यांचा लाभ घेत सर्व आकाराच्या आणि उद्योगातील व्यवसायांमध्ये प्रयोगशीलता आणण्याचे लक्ष्य सेल्सफोर्सने बाळगले आहे. त्यातून ग्राहकांशी संवादात क्रांती घडून येईल आणि भरीव प्रमाणात व्यावसायिक मूल्य खुले होतील.
सेल्सफोर्सच्या भागीदार आणि स्टार्टअप इकोसिस्टिमच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे आले आहे. सेल्सफोर्सने निश्चित केलेल्या उभरत्या सर्वोच्च दहा उगवत्या शहरांमध्ये २५ टक्के भागीदार हे पुण्यात आहेत. याशिवाय सेल्सफोर्स स्टार्टअप कम्युनिटीतील सर्वाधिक सक्रिय केंद्रांपैकी पुणे हे एक असून २० स्टार्टअप या शहरात जोमात सुरू आहेत. या शहरातील अनेक स्वयंपूर्ण, बीएफएसआय आणि उत्पादन व्यवसायांशीही सेल्सफोर्सने सहकार्य केले आहे. सर्व क्षेत्रांतील ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्व्याख्या करण्याचे तिचे लक्ष्य आहे.
अरुंधती भट्टाचार्य यांनी सेल्सफोर्सच्या विकासाच्या धोरणातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित केले.“अलीकडच्या वर्षांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा स्वीकार लक्षणीय आहे. पुणे हे गतिशील आयटी केंद्र म्हणून पुढे आले असून तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आणि डिजिटल परिवर्तन याबाबतीत ते अग्रेसर आहे. ही उगवती स्टार्टअप इकोसिस्टिम ही या शहरात चालना मिळत असलेल्या प्रयोगशीलतेची निदर्शक आहे. सर्व क्षेत्रांतील व्यवसाय हे डिजिटल परिवर्तनासह बदलांचे नेतृत्व करत आहेत आणि या शहरात आमची उपस्थिती सुदृढ करत असताना त्यांच्या या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल आम्हाला आनंद आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.
सेल्सफोर्सच्या तंत्रज्ञानाने नागरिकांचा अनुभव समृद्ध करण्याकरिता परिवर्तनाला चालना देण्यासाठी, सरकारी संस्था व सार्वजनिक उद्यमांचे सशक्तीकरण करण्यासाठी सेल्सफोर्सने नुकतेच भारतात सार्वजनिक क्षेत्र विभागाची घोषणा केली आहे. याशिवाय सेल्सफोर्सने भारतासाठी पहिल्यांदाच बनविलेले डिजिटल कर्ज प्रदानाचे उत्पादन सादर केले आहे. हैदराबाद, बंगलुरु, मुंबई, गुरुग्राम, पुणे आणि जयपूर येथे असलेल्या ११,००० कर्मचाऱ्यांसह सेल्सफोर्स भारतात आपली उपस्थिती व प्रभाव वाढवत आहे.
एआयमुळे वाढीला कशी चालना मिळते, ग्राहकांशी संबंध कसे सुधारतात आणि कर्मचाऱ्यांची उत्पादकता यांना कसे पोषक वातावरण मिळते हे या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. त्यातून पुण्यातील प्रयोगशीलता व डिजिटल परिवर्तन यांसाठी सेल्सफोर्सची कटिबद्धता अधोरेखित झाली.