Devkinandan Aggarwal : निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ व्यावसायिक वकील व विश्व हिंदू परिषदेच्या(Vishwa Hindu Parishad) कार्यातील सक्रिय कार्यकर्ते श्री.देवकीनंदन अग्रवाल(Devkinandan Aggarwal) यांनी एक नव्यानेच दावा न्यायालयात दाखल केला. हा अनोख्या पद्धतीचा दावा होता. वादग्रस्त ठरविल्या गेलेल्या जागेवर प्रकट झालेली रामलल्लाची (Ramlalla) बालमूर्ती व वादग्रस्त ठरविली गेलेली जागा या दोघांच्या वतीने त्यांचा जवळचा मित्र – सखा या भूमिकेतून मी दावा दाखल करत असल्याचे देवकीनंदन अगरवाल(Devkinandan Aggarwal) यांनी न्यायालयात सांगितले. हा दावा १ जुलै १९८९ रोजी दाखल झाला होता.(Sri Ramlalla’s friend filed suit in court)
या दाव्याचे वैशिष्ट्य हे होते, की राम जन्मस्थान व त्या ठिकाणी विराजमान असलेली रामाची बालमूर्ती हे दोघेही न्यायिक व्यक्ती म्हणून या दाव्यामध्ये न्यायालयासमोर आले होते व न्यायालयाने त्यांना मान्यता दिली होती. त्या स्थानी विराजमान देवता रामलल्ला हे निरंतर बालक असल्यामुळे त्याच्या जवळच्या सख्याला म्हणजेच मित्राला त्याच्या वतीने बाजू मांडायचा अधिकार न्यायालयाने दिला होता.
रामजन्मभूमीसाठी अनेक दावे हिंदू समाजाकडून दाखल केले गेले होते, परंतु यापूर्वी दाखल झालेल्या दाव्यांमध्ये रामलल्लाच्या दर्शनाची, पूजा – पाठाची मागणी केलेली होती. परंतु सन १९६१ मध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केलेल्या दाव्यानंतर हिंदू समाज जागा झाला व देवकीनंदन अगरवाल यांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये जमिनीची मालकी मागितली होती. तत्कालीन राजकीय नेतृत्वांनी देखील अशा प्रकारच्या मागणीचे समर्थन केले होते. वक्फ् बोर्डाची मागणी न्यायालयाने मान्य करू नये यासाठीच वादग्रस्त ठरविली गेलेली जागा हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावी व त्या ठिकाणी राम जन्मस्थान घोषित करून तेथे मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी अशीच याचिका देवकीनंदन अगरवाल यांनी दाखल केलेली होती.
अयोध्येतील राम जन्मभूमीचा संपूर्ण परिसर विराजमान देवतेच्या मालकीचा म्हणून जाहीर करावा, आपल्या भक्तांना दर्शन घेण्यासाठी होणारा त्रास व दर्शनात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, जुनी इमारत व बांधकामे दूर करून नवे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा या मुख्य मागण्या देवकीनंदन अगरवाल यांनी आपल्या दाव्यात केल्या होत्या. या दाव्यामुळे रामजन्मभूमी मुक्तीच्या संघर्षाला एक वेगळे वळण मिळाले व भारताच्या न्यायालयीन इतिहासात हा दावा आगळा वेगळा ठरला.
संकलन – डॉ..सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६