श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे


नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी 3 एप्रिल रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनाम्याच्या यादीत पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान,श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns )  महिंद्रा राजपक्षे (Mahindra Rajapaksa) यांनीही राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द  केला आहे. मात्र, पंतप्रधान कार्यलयाकडून राजीनामाचे वृत्त फेटाळण्यात आले आहे.

दरम्यान, मंत्र्यांच्या राजीनाम्यादरम्यान, श्रीलंकेत लवकरच सर्वपक्षीय सरकार स्थापन होऊ शकते, अशा बातम्याही आल्या आहेत. म्हणजेच सध्याच्या सरकारमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही समावेश होणार आहे. श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे देशात स्थैर्य येऊ शकते, असा सरकारचा विश्वास आहे.

अधिक वाचा  ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या १५  वर्षीय मुलाने जीवन संपवलं : गॅलरीतून जम्प कर, कागदावरील स्केचनं उलगडलं मृत्यूचं गूढ

सभागृह नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने म्हणाले की, कॅबिनेट मंत्र्यांनी आपले राजीनामे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. मात्र, या सामूहिक राजीनाम्याचे कारण त्यांनी दिलेले नाही. मात्र, जनतेच्या प्रचंड दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. वास्तविक, श्रीलंकेतील बहुतेक लोकांचे म्हणणे आहे की, सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांचा देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी आणि जाहीर निषेध

श्रीलंका आर्थिकदृष्ट्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे आणि त्यामुळे देशातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारविरोधातील लोकांची निदर्शने थांबवण्यासाठी राष्ट्रपतींनी १ एप्रिल रोजी आणीबाणी जाहीर केली. यानंतर 2 एप्रिलपासून 4 एप्रिलच्या सकाळपर्यंत संचारबंदीही लागू करण्यात आली होती. 4 एप्रिलच्या सकाळी संचारबंदी संपणार असतानाही जनतेच्या वतीने 3 एप्रिलच्या संध्याकाळी व्यापक निषेध नोंदवण्यात आला. श्रीलंकेच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कर्फ्यूचे उल्लंघन करून सरकारविरोधी रॅली काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्रीलंकेच्या पश्चिम भागात 600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.

अधिक वाचा  कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट

श्रीलंका सध्या ज्या टप्प्यातून जात आहे, तो टप्पा त्यांनी अनेक दशकांपासून पाहिलेला नाही. सरकारी तिजोरी जवळपास रिकामी आहे. इतके कमी परकीय चलन उरले आहे की त्याला लागणारे इंधनही तो उचलू शकत नाही. श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर खाद्यपदार्थांचे दरही गगनाला भिडले आहेत.

सर्वसामान्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. खाद्यपदार्थ, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. वीजपुरवठा खंडित होणे ही जनतेसाठी वेगळीच डोकेदुखी ठरली आहे. दिवसातून 13-13 तास वीजपुरवठा खंडित होतो.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love