पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून(१० एप्रिल): ६५ टक्के विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

Graduation ceremony of Savitribai Phule Pune University
The test paper for the fellowship offered through Barti, Sarathi, Mahajyoti organizations has cracked?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी प्रथम सत्र परीक्षा उद्यापासून (१० एप्रिल) सुरू होत आहे. या परिक्षेआधी घेण्यात आलेल्या सराव परिक्षेलाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थ्यांनी ही सराव परीक्षा दिली आहे.

परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील सर्व संलग्न महाविद्यालयातील ५ लाख विद्यार्थी ८० हजार २२४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातील ३ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे.

विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन तर्फे यंदा पहिल्यांदा ही परीक्षा घेतली जात असून ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नियमित, बॅकलॉग, एटीकेटी अश्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एमसीक्यू पध्दतीने ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर ४८ तासांत त्यांच्या स्टुडंट प्रोफाइलला दिसणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ८० लोकांचा तांत्रिक गट कार्यरत असणार आहे. विद्यार्थ्यांचा स्कोअर जाहीर झाल्यानंतर ४८ तासांच्या आत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास स्टुडंट प्रोफाइलला विद्यार्थ्यांना त्यांची तक्रार नोंदवता येणार आहे.

अधिक वाचा  जेष्ठ नागरिकांमधील पडण्याचे प्रमाण कमी करणे शक्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात संशोधनपर अभ्यास

‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’ च्या तांत्रिक विभागाचे प्रमुख गजानन अमलापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज ऐंशी हजार ते दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल अशा पध्दतीने परीक्षेचे नियोजन केले असून ही परीक्षा साधारण ४० ते ४५ दिवस चालणार आहे. एक विद्यार्थी किमान ५ ते ६ विषयात परीक्षा देणार असून याप्रमाणे जवळपास ३२ लाख परीक्षा या विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ मानले जात आहे.

अडचण आल्यास इथे संपर्क करा

या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्यासाठी ०२०- ७१५३०२०२ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय विद्यापीठाच्या एक्झाम सेक्शन मध्येच एक चॅट बॉक्स ही विद्यार्थ्यांना दिसेल त्यावर ते त्याच्या अडचणी सांगू शकतात.

अधिक वाचा  वी फाऊंडेशन आणि एरिक्सनच्या वतीने वंचित विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक लॅब सुरु

युजरनेम व पासवर्डसाठी महाविद्यालयांशी संपर्क साधा.

ज्या विद्यार्थ्यांना अद्याप युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा व युजरनेम व पासवर्ड मिळवावा.

दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिट अधिक वेळ

सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे २० मिनिट अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच अंध विद्यार्थ्यांना सोबत मदतनीस घेता येईल.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यांनंतरही काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. सर्वांना शुभेच्छा..!

डॉ.महेश काकडे, संचालक

परीक्षा व मूल्यमापन मंडळ

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love