मुंबई : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड (“कंपनी”) ने मंगळवारी, १० सप्टेंबर २०२४ रोजी आपली प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली / ऑफर बंद होण्याची तारीख गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ असेल. प्रमुख गुंतवणूकदार बोली तारीख बोली/ऑफर खुली करण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार, ०९ सप्टेंबर २०२४ आहे.
ऑफर साठी प्रति इक्विटी शेअर्ससाठी 456 रु. ते 480 रु चा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 31 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 31 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू 8,500 दशलक्ष रु. पर्यंत आहे आणि 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची विक्री 2,500 दशलक्ष रु. पर्यंत आहे. एकूण ऑफर साईजमध्ये 11,000 दशलक्ष रु. पर्यंतचे 10 रु. चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत. विक्रीची ऑफर मध्ये SVG बिझनेस ट्रस्ट (प्रवर्तक विक्री शेअरधारक) कडून 2,500 दशलक्ष रु. पर्यंत 10 रु. चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स आहेत.
आयपीओ मधून जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे वापरण्याचा प्रस्ताव आहे: (i) महाराष्ट्रातील १२ नवीन दालन उभारणीसाठीच्या खर्चाचा वित्तपुरवठा; (ii) कंपनीने घेतलेल्या काही कर्जाचे पूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा पूर्व-भरणा; आणि (iii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) 1957 नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु म्युचुअल फंडांकडून असलेली एकूण मागणी QIB च्या एकूण हिश्शाच्या 5% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठीचे शिल्लक इक्विटी शेअर्स QIB च्या गुणोत्तरीय वाटपासाठी उर्वरित QIB भागात जमा केले जातील. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या अनुषंगाने सादर केलेले इक्विटी शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला BSE आणि NSE कडून ३ जुलै २०२४ रोजीच्या पत्राद्वारे सूचीबद्ध करण्यासाठी तत्त्वत: मान्यता प्राप्त झाली आहे.