ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान : सचिन खिलारी

ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान
ऑलम्पिकमध्ये रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान

पुणे(प्रतिनिधि)–ऑलम्पिक मध्ये मला रौप्यपदक मिळाले त्यामुळे महाराष्ट्राचा ५२ वर्षाचा दुष्काळ नाहीसा झाला याचा मला अभिमान आहे. २०२८ ला येणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये माझ्यासह माझा विद्यार्थीही पदक मिळवील व त्या पदकाचा रंग नक्कीच सुवर्ण असेल, असा विश्वास पॅराऑलिंम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या सचिन खिलारी याने गुरुवारी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता सचिन खिलारी याच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.

सचिन बोलताना पुढे म्हणाला की या स्पर्धेमध्ये मला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करायचे होते, परंतु बदलत्या  हवामानामुळे माझी ऊर्जा कमी पडली. त्यामुळे मी सुवर्ण पदकापासून लांब राहिलो याची मला खंत आहे.

अधिक वाचा  कॅप्टन कुल धोनीने घेतले पुण्यात घर

पदक  जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला हे सांगताना सचिन म्हणाला की, देशाचे पंतप्रधान जेव्हा फोन करून आपल्या बोली भाषेत शुभेच्छा देतात तेव्हा झालेला आनंद खूप वेगळा होता.  मोदींनी मराठीतून मला शुभेच्छा दिला याने मी भारावून गेलो.

दिव्यांगांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत बोलताना सचिन म्हणाला की,  दिव्यांग खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना आर्थिक मदत समानच मिळत आहे. दोन्ही गटातील खेळाडूंना समान वागणूक मिळत आहे त्यामुळे आम्हाला भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून चांगल्या सुविधा मिळत आहेत. पदक  जिंकल्यावर महाराष्ट्र सरकारने मला क्लासवन ऑफिसरची नोकरी दिली आहे. यासारखे दुसरे भाग्य नाही. हे माझ्या आई वडिलांचे आशीर्वादाचेही फळ आहे.

पुढे बोलताना सचिन म्हणाला की आयुष्यात मी खूप उतार चढाव  बघितले आहेत.  त्यामुळे मी मुलांना मोफत गोळा फेकचे तसेच भूगोल हा माझा आवडीचा विषय आहे त्याचे मार्गदर्शन करतो. मी स्पर्धा परीक्षा देत होतो परंतु त्यात मी यशस्वी होऊ शकलो नाही. पण मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचे आहे. की स्पर्धा परीक्षेत भरपूर अडचणी आहेत. तुम्ही दोन-तीन वर्ष प्रयत्न करा त्यानंतर मात्र वेळ वाया न घालवता दुसऱ्या क्षेत्रात प्रगती करा. यासाठी माझे उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पालकांनी लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी त्यांना ग्राउंडवर पाठवा याने मुले सुदृढ होते व भविष्यात माझ्यासारखी क्लास वन ऑफिसर होतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love