३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन !

Governor Ramesh Bais inaugurated the 35th Pune Festival
Governor Ramesh Bais inaugurated the 35th Pune Festival

पुणे- कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल.

राज्याचे पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा सौ. अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.

अधिक वाचा  चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात? : महाराष्ट्र शासनाकडून मागवला सविस्तर अहवाल

ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमामालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईट, ऑल इंडिया मुशायरा, जाणता राजा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिला महोत्सव, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, इंद्रधनु, कथ्थक, भरतनाट्यम, लावणी, विविध नृत्य अविष्कार, मराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग, कुस्ती व मल्लखांब अशा क्रीडास्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्ये आहेत.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोहोचवला. त्यावेळी त्यामध्ये कथाकथन, कीर्तन, पोवाडे, लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. यापासूनच प्रेरणा घेऊन १९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३५ वर्षे चालू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरु झाले. त्यामुळेच पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हलस’ म्हटले जाते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते.

अधिक वाचा  ५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप : जनजाती कल्याण आश्रम आणि बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड यांच्या प्रयत्नांना यश

ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. स्वाईन फ्ल्यू (२००९) आणि कोरोना (२०२०, २०२१) अशी ३ वर्षे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत. उर्वरित ३२ वर्षात नृत्यांगना हेमामालिनी यांनी तब्बल ३० वर्षे बॅले, गणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर करतात. त्यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांच्या पहिल्या स्टेज शोची सुरुवात त्यांनी पुणे फेस्टिव्हलपासूनच केली. पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदा उद्घाटन सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

पुणे फेस्टीव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात.

अधिक वाचा  आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, मायर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love